Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे महाबळेश्वर येथे आगमन; जिल्हाधिकारी यांनी केले स्वागत

 राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे महाबळेश्वर येथे आगमन;  जिल्हाधिकारी यांनी केले स्वागत

महाबळेश्वर टाईम्स



महाबळेश्वर  दि.२५ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे राजभवन महाबळेश्वर येथे आगमन झाले. यावेळी  जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के यांनीही राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी पोलीस विभागाच्यावतीने राज्यपाल महोदयांना मानवंदना देण्यात आली.राज्यपालांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासमवेत चर्चा केली. महाबळेश्वरला देश- परदेशातील पर्यटक येतात, त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची सूचना त्यांनी केली. तसेच महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक जैविक शेतीकडे वळावे यासाठी प्रोत्साहन द्यावे असेही राज्यपाल म्हणाले.यावेळी राज्यपालाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.