Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

अहिल्यानगर येथील मातंग समाजातील युवकावरील अमानुष हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात यावी म. प्र. झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे निषेधार्थ निवेदन देण्यात आले.

 अहिल्यानगर येथील सोनाई येथे मातंग समाजातील  संजय वैराग या युवकावरती अमानुषपणे प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा होण्याबाबत म. प्र. झोपडपट्टी सुरक्षा दल या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे निषेधार्थ निवेदन देण्यात आले.          

                                 


          .                 .     याप्रसंगी म. प्र. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत (सनी) ननावरे म्हणाले संजय वैराग या युवकावरती हल्ला करणारे सर्व आरोपींना तात्काळ अटक करून मकोका कायद्यांतर्गत कारवाई करून संबंधितांना तीन-चार जिल्ह्यातून तडीपार करावे तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा.  मागणी केली आहे तसेच ज्या हद्दीत गुन्हा करण्यासाठी आरोपींना मोकळीक दिली तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी याच्यावर ठपका ठेवून गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्या, मोकळीक देणाऱ्या विजय माळी यांना सहआरोपी करावे. त्याबरोबर माळी यांना पोलीस प्रशासन बडतर्फ करावे. जलद गतीने  न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल करून संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी. अन्यथा महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संघर्ष नायक लोकनेते भगवानरावजी वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाईल याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी.                        

     यावेळी म. प्र. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे वाई तालुकाध्यक्ष  प्रवीण संकपाळ संघटनेचे प्रवक्ते  ऋषिकेशजी जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष  दिलीपजी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष  संतोष फरतडे,  संतोष बाबर, जिल्हा सरचिटणीस  संजय सकटे,  सुनील भिसे,  राजेंद्र सोनवणे,  करण साठे,  विजय भिसे, वृषाली कांबळे,  सिद्धाराम ढोबळे इत्यादी उपस्थित होते.