Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

गुताड येथे झालेल्या किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर.....

 मेट गुताड येथे झालेल्या किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर.....


*प्रथम क्रमांक  गोपाळ कृष्ण मंडळ,  द्वितीय क्रमांक जय हनुमान मंडळ*

*तर तृतीय क्रमांक ओजस  बावळेकर यांनी पटकविला*

महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर -मेटगुताड गावामध्ये किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मेटगुताड   ग्रामपंचायत सभागृहात  किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शासनदार झाला संपन्न . या स्पर्धेत मेट गुताड येथील    ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अनेक स्पर्धकांनी शिवकाली किल्ले साकारले.

जय हनुमान मंडळ मेटगुताड यांच्या सौजन्याने   किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी  माती, दगड, कागद व इतर साहित्याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हुबेहुब साकारले या मध्ये ४ किल्ले सर्वांना खुपच आकर्षीत करणारे ठरले   गावातील काही लहान मुलीनी देखील किल्ले बांधणी स्पर्धेत सहभाग घेतला हे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य. दिपावली च्या कालावधीमध्ये झालेल्या किल्ले स्पर्धेत स्थानिक  नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला असून किल्ले पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

स्पर्धेतील विजेत्यांना  आकर्षक बक्षीसेही देण्यात आली या मध्ये प्रथम क्रमांक विजेते - गोपाळ कृष्ण मंडळ मेट गुताड, द्वितीय पारितोषिक विजेते - जय हनुमान मंडळ, मेटगुताड, तृतीय पारितोषिक विजेते- ओजस  बावळेकर आणि ग्रुप, चतुर्थ पारितोषिक विजेते - आयुष   बावळेकर, उत्तेजनार्थ पुरस्कार विजेते - सुयश   बावळेकर व श्रीराज  बावळेकर.

संतोष   बावळेकर , संजय   बावळेकर, श्रीकांत   बावळेकर, महेश   बावळेकर, अंकुश (नाना ) बावळेकर, गणेश   बावळेकर व  दिनेश   बावळेकर  यांनी किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीकासाठी मदत केली.तर प्रविण ओंबळे व सुमित गोळे राजू (आप्पा) बावळेकर, उमेश बावळेकर (पाटील), धनंजय बावळेकर, ऋषिकेश बावळेकर, सनी बावळेकर  यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.

या स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाला ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्य व जय हनुमान मंडळातील सर्व सदस्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.