Type Here to Get Search Results !

रान गव्याच्या हल्ल्यात महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.... महाबळेश्वर टाईम्स तापोळा : प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट या गावातील रहिवाशी राघू जानू कदम या शेतकराचा जागीच मृत्यू झाला. राघू कदम हे सकाळी शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपार नंतर गावातील अन्य लोक शेतात जात असताना राघू कदम मृत अवस्थेत पडलेले दिसले. राघू कदम यांच्यावर रान गव्याने शिंगाने जबर हल्ला केला असून रान गव्याने जोरदार धडक दिल्याने राघू कदम हे जागीच मृत पावले. रानगव्याची संख्या जास्त झाल्याने शेतीचे फार मोठे नुकसान होत आहे. आज च्याघटनेमुळे गावातील तसेच तापोळा परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही दुःखद घटना समजताच परिसरातील लोकांचा जनसमुदाय जमा झाला. तसेच घटनास्थळी वन अधिकारी, पोलीस कर्मचारी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. व पुढील तपास पोलीस प्रशासन,वन विभाग करत आहेत.