Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

आर्थर सीट पॉईंट कडे जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाकडून मातीचा वापर पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य अपघातास निमंत्रण स्थानिकांसह पर्यटक त्रस्त*



 *आर्थर सीट पॉईंट कडे  जाणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाकडून मातीचा वापर पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य अपघातास निमंत्रण स्थानिकांसह पर्यटक त्रस्त*                         महाबळेश्वर टाईम्स


__________________

 नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या तयारीवर गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. महाबळेश्वरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी असलेल्या ‘ऑर्थर सीट पॉइंट’कडे जाणारा रस्ता अनेक महिन्यांपासून खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.राज्यपाल येण्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र या तात्पुरत्या डागडुजीमुळे रस्त्याचे चिखलात रूपांतर झाले. परिणामी राज्यपालांनाच या चिखलातून मार्गक्रमण करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली परीसरातील नागरिक  राज्यपालांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ‘चिखलाच्या पायघड्या’च घातल्या अश्या प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत.

*पर्यटनस्थळाची प्रतिमा मलिन*

महाबळेश्वर हे राष्ट्र आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणारे हिलस्टेशन. अशा ठिकाणाचा मुख्य पर्यटन मार्गच दुरवस्थेत असेल तर पर्यटन विकासाची मोठी थट्टाच असल्याची बूज वाढली आहे.


पर्यटकांना चालणेही कठीण झाले असून वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा अक्षरशः त्रास होत आहे.


*वाहतूक कोंडीने त्रस्त पर्यटक*

श्रीक्षेत्र महाबळेश्वर प्रवेशद्वाराजवळील महत्त्वाच्या चौकात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली.

*पॉईंटकडे जाणारी वाहने*

श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी जाणारी वाहने

दोन्ही वाहन प्रवाह एकत्र येत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होत आहे.या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक व पर्यटकांकडून होत आहे. राज्यपालांचा दौरा हा केवळ व्हीआयपी व्यवस्थेपुरता नसून प्रशासनाची त्वरेने आणि शास्त्रीय पद्धतीने काम करण्याची क्षमता मोजण्याची वेळ आहे.पर्यटन हे महाबळेश्वरचे मुख्य अर्थकारण — त्यामुळे या क्षेत्रातील मूलभूत समस्या न सोडवल्यास संपूर्ण पर्यटन क्षेत्र धोक्यात येऊ शकते.

_________________________

*प्रशासनावर टीका*

आधीच माहिती असताना ऐनवेळी घेतलेले निकृष्ट निर्णय

व्हीआयपी दौरा असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष

महाबळेश्वरात योग्य नियोजन आणि आढावा बैठका नसल्याचा आरोप

सातारा जिल्ह्यात चार-चार मंत्री असूनही पर्यटन हंगामात अशी दुरवस्था होणे ही शरमेची बाब असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे.“राज्यपाल येत असताना देखील रस्ते नीट होत नसतील, तर सामान्य पर्यटकांसाठी सुधारणा कधी होणार?” असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

___________________________

*स्थानिकांचे व्यवसाय ठप्प*

आर्थरसीट पाॅइट रस्त्यावर मातीने खड्डे भरल्यामुळे वाहने घसरून अपघात होण्यास सुरूवात त्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला.त्यामुळे पाॅइट परीसरातील व्यवसाय ठप्प झाले याचा स्थानिक नागरिकांना चांगलाच फटका बसला.पर्यटकांनवर येथील उर्दरनिर्वाह असल्यामुळे बांधकाम विभागाच्या अश्या गलथान कारभारामुळे स्थानिक व्यवसायिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

_________________________________

आवश्यक उपाययोजना 

✅ वाहतुकीसाठी समर्पित पोलीस कर्मचारी

✅ खड्डेमुक्त रस्ते — तात्पुरती नव्हे तर दर्जेदार दुरुस्ती

✅ हंगामापूर्वी आढावा बैठका

✅ पर्यटकांसाठी सुरक्षित व सुटसुटीत व्यवस्था