Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर*



 शिवजयंती उत्सव समितीच्या पाठपुराव्याला यश 

 *महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर* 

महाबळेश्वर टाईम्स 

MAHABALESHWAR TIMES 

महाबळेश्वर:  गेल्या अनेक दिवसांपासून शिवजयंती उत्सव समिती महाबळेश्वर आणि शिवभक्तांनी केलेल्या अथक पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी  जिल्हा नियोजन समिती मार्फत  निधी मंजूर करण्यात आला  आहे. 


या निधीसाठी  राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई , सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले  यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मान्यवरांच्या विशेष प्रयत्नांमुळे  सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण झाल्यास महाबळेश्वरच्या सौंदर्यात आणखी भर पडेल आणि महाराजांचे प्रेरणादायी स्थान अधिक आकर्षक होईल. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमुळे चौकाचे सुशोभीकरण होणार आहे.  शिवजयंती उत्सव समिती व महाबळेश्वर वासियांनी सर्व लोकप्रतिनिधींचे  आभार मानले आहेत. 




समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवभक्तांनी घेतलेल्या कष्टामुळे आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा ऐतिहासिक निर्णय झाला, असे मत समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या चौकाचे सुशोभीकरण हे केवळ काम नाही, तर ती शिवभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी आमच्या मागणीची दखल घेऊन तत्काळ निधी उपलब्ध केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.आता लवकरच या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे काम सुरू करावे आणि महाबळेश्वर शहराच्या वैभवात भर पाडावी अशा भावनाही शिवभक्तांनी व महाबळेश्वर वासियांनी व्यक्त केल्या आहेत.