*नंदकुमार शिंदे यांचा*
*विद्या वाचस्पती या विशेष* *पुरस्काराने दिल्ली येथे सन्मान*
महाबळेश्वर टाईम्स : प्रतिनिधी
महाबळेश्वर : सातारा
महाबळेश्वर तालुक्यातील माचुतर गावचे सुपुत्र, शिक्षण प्रेमी ,आदर्श शिक्षक , इंग्रजी हिंदी व सर्वच भाषांवर प्रभुत्व असणारे
डॉ.नंदकुमार शिंदे
यांना दिल्ली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन धाम ( मथुरा) यांच्यावतीने शिक्षण व समाजसेवा यामध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल विशेष
"विद्या वाचस्पती" सारस्वत सन्मान डॉक्टरेट इन एज्युकेशन अँड सोशल वर्क सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले.
पुरस्कार सोहळा दिल्ली येथील हाॅटेल रेडिसन ब्ल्यू पश्चिम बिहार नवी दिल्ली येथे पार पडला.
श्री. शिंदे यांनी ३७ वर्षे शिक्षकी पेशा मध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांनी यापूर्वी माचुतर,कुरोशी तसेच आदर्श शाळा मेढा येथे उल्लेखनीय काम करत विद्यार्थ्यांच्या शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी मोलाचे प्रयत्न केले. आपल्या शासकीय सेवेमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबरच अध्यात्मिक,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग होता. अध्यापनाबरोबरच परिसरातील गोरगरीब रुग्णांची विविध माध्यमातून ही अत्यंत तळमळीने मदत केली. सामाजिक कार्य व समाज जीवनावर होणारा परिणाम यावर केलेला चिकीत्सक अभ्यास वैद्यकिय क्षेत्रातील काम व 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्यूल्ड ऑफ ह्यूमन बाॅडी' यावर लिहलेले आंतरराष्ट्रीय लेखन,(असोसिएट फाॅर राॅयल सोसायटी ऑफ हेल्थ लंडन) या सर्व बाबींचा विचार करून पं.दिनदयाल विद्यापीठाचे कुलसचिव व कुलगुरू तसेच प्रबंध कमेठी,यांचे अंतिम मान्यतेने, "विद्या वाचस्पती या विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
श्री. शिंदे यांचे सर्व ग्रामस्थ, मान्यवर, गावातील तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक यांनी अभिनंदन करुन त्यांच्या पुढीलवाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Social Plugin