Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावीजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

 पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी   उरलेत शेवटचे तीन दिवस 

सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करा                         जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन             महाबळेश्वर टाईम्स



सातारा : 

शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तरी जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.




जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी व कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नोंदणीचे काम मिशन मोडवर करावे. पदवीधर मतदान नोंदणीसाठी राजकीय पक्षांची व जिल्ह्यातील महाविद्यालयांची मदत घ्यावी,असे निर्देश यंत्रणांना दिले.



तसेच बरेच शिक्षकही पदवीधर आहेत. त्यांचीही पदवीधर मतदार म्हणून नोंद करावी. मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी. एकही शिक्षक नोंदणीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.