महाबळेश्वरमध्ये भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष
इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वराच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन : शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती
महाबळेश्वर दि ०४-११ भारताच्या महिला क्रिकेट संघाने पहिला आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात जल्लोष सुरु असून इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या संकल्पनेतून महाबळेश्वर शहरात भव्य रॅली काढून विजयाच्या धून वाजवून विजयोत्सव साजरा करण्यात आला येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामधून रॅली स प्रारंभ झाला ''भारत माता की जय'' नरी शक्तीचा विजय असो ''हिप हिप हुर्रे''अश्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता ही रॅली मुख्य बाजारपेठे मार्गे छ शिवाजी महाराज चौक मार्गे मस्जित रास्ता ते पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये पोहचली या रॅलीमध्ये इनरव्हील क्लब सदस्यांसह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे,मुक्ता कोमटी,सपना अरोरा,राधा मुक्कावार,अदिती भांगडिया,नेहा साळवी,गीत नागपाल,अश्विनी कोमटी,भक्ती जाधव,गायत्री जाधव,लक्ष्मी यरलगड्डा,वैशाली चौरसिया पुणे क्लब आयपीपी स्वाती अय्यर आदी सदस्यांसह माजी नगरसेविका स्वाती भांगडिया,शोभा महाबळेश्वरवाला,उषाताई ओंबळे,पार्वती भांगडिया यांच्यासह एमईएस शाळा,गिरिस्थान प्रशालेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Social Plugin