महाबळेश्वर टाईम्स महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ नगराध्यक्षपदाचे उमेदवार डी.एम. बावळेकर यांची प्रचारा मध्ये आघाडी
महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डी.एम. बावळेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महाबळेश्वर वासियांचा प्रतिसाद वाढत आहे.
लोकमित्र जनसेवा आघाडीचे दतात्रय मारुती बावळेकर ( डी एम ) साहेब यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. श्री.बावळेकर ३ वेळा नगराध्यक्षपद व २४ वर्षे नगरसेवक म्हणून महाबळेश्वरची सेवा केली आहे. नगराध्यक्ष असताना श्री.बावळेकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी आणून महाबळेश्वरचा भरीव विकास केला आहे. त्यांना कामाचा दांडगा अनुभव असून नगराध्यक्ष व नगरसेवक असताना त्यांनी महाबळेश्वरच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. याच जोरावर ते निवडणूकीला सामोरे जात आहेत.
लोकमित्र जनसेवा आघाडीच्या माध्यमातून, सर्व सामान्य नागरिकांच्या सुविधा, पर्यटन वाढीसाठी, पर्यटक सुविधा,स्थानिकांच्या व्यावसायामध्ये वाढ,युवा युवतीना उद्योगास प्रवृत्त करणे, छोटे मोठे व्यावसायिक हातगाडीधारक, घोडे व्यावसायिक, टॅक्सी व्यावसायिक, पथारी व्यवसायिकांना शाश्वत रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. बावळेकर सांगतात
पर्यटकांना सुविधा, शहराचे सुशोभीकरण, कायदा व सुव्यवस्था आबादी ठेवून तसेच
सर्वांना बरोबर घेऊन महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. बावळेकर हे प्रचारांमध्ये विश्वासाने सांगतात. लोकमित्र जनसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून द्यावे असे आवाहनही श्री. बावळेकर यांनी केली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :- राहुल शेलार
मो.नं 9422604420
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
मो.नं : 9403546485







Social Plugin