महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर मरीपेठ येथील ड्रेनिज प्रकरणी स्वच्छता समिती सभापती संजय जंगम यांची पाहणी
(यावेळी पाहणी करताना नगरसेवक स्वच्छता समिती सभापती संजय जंगम व स्वच्छता विभाग कर्मचारी)महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : संदेश भिसे
महाबळेश्वर शहरातील मरीपेठ परिसरातील सार्वजनिक भुयारी ड्रेनिज मध्ये मांसाहारी टाकाऊ आतड्या आढळल्याच्या प्रकारानंतर नव्याने निवड झालेल्या स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती संजय जंगम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
या वेळी स्वच्छता विभागाचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान काही ठिकाणी ड्रेनेज लाईनमधील पाणी थेट गटारामध्ये सोडल्याचे निदर्शनास आले. तसेच काही मिळकतधारकांच्या ड्रेनेज लाईन फुटून किंवा परस्पर जोडणी करून सांडपाणी गटारात सोडले जात असण्याचे निदर्शनास आले
सभापती जंगम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण परिसराची तपासणी करून ज्या मिळकतधारकांकडून नियमभंग होत आहे, त्यांना तातडीने आवश्यक सूचना कराव्यात असे निर्देश दिले.
याचबरोबर परिसरातील मटण व चिकन विक्रेत्यांनाही मांसाहारी टाकाऊ अवशेषांची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत सक्त सूचना करण्यात आल्या. कचरा किंवा टाकाऊ पदार्थ गटारात टाकल्यास आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिके कडून पुढील काही दिवसांत विशेष स्वच्छता मोहीम राबवून ड्रेनेज व्यवस्थेची तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin