पाचगणीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भव्य अनावरण
महाबळेश्वर टाईम्स १२/१०/२०२५
पाचगणी प्रतिनिधी नौशाद सय्यद
पर्यटन नगरी पाचगणीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे अनावरण आज रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण व नूतनीकरण पूर्ण झाले असून, स्मारक परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला आहे. रविवारी सकाळी ९ वाजता नूतन मूर्तीची विधिवत पूजन व प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे.
यानंतर मिरवणुकीसह वारीकरी नामफेरी, किर्तन, ढोल-ताशा पथक, घोडदळ, भगवे झेंडे आणि विविध सांस्कृतिक झांजपथकांची सादरीकरणे होणार आहेत.
सोहळ्यानिमित्त संध्याकाळी भव्य फटाक्यांची आतषबाजी, लाईट शो, व्याख्यानमाला व महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून, पाचगणीकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
Social Plugin