Type Here to Get Search Results !

महाबळेश्वर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर.....



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर  (सातारा ) दि ६ /१० /२०२५      

             राज्यातील अगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी  मुंबईत  नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या  नगरपालिका निवडणूक येत्या काही दिवसात लवकरच निश्चित होणार याची अशा निर्माण झाली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या आधी नगरध्यक्षाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. महाबळेश्वर मध्ये नगरध्यक्षपदासाठी आता मोठी  चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. 



                    नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवस  उरले असताना  . नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर होताच महाबळेश्वर शहरांमध्ये राजकीय तापमान कमालीचे  वाढले आहे. यावेळी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत.