*महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत जाहीर*
महाबळेश्वर टाईम्स महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सन २०२५ - २६ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला) अनुसूचित जमाती (महिला) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व साधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्या करिता आज खादी व ग्रामोद्योग सभागृह, बंगला क्र.५ महाबळेश्वर येथे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नियंत्रक अधिकारी अभिषेक देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखालील आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्या काढण्यात आल्या. एकूण दहा प्रभागांमध्ये खालील प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.
प्रभाग क्रमांक १ अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC (सर्वसाधारण), ब)सर्वसाधारण (महिला). प्रभाग क्रमांक २ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), ब)सर्वसाधारण (महिला). प्रभाग क्रमांक ३ अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ४ अ) अनुसूचित जाती (सर्वसाधारण), ब) सर्वसाधारण (महिला). प्रभाग क्रमांक ५ अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ६ अनुसूचित जमाती (महिला), ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ७ अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ८ अ) अनुसूचित जाती (महिला), ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक ९ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १० अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण.
५० टक्के महिला आरक्षण असल्यामुळे महाबळेश्वर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा १० महिला नगरसेविका म्हणून संधी मिळणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही प्रभागांमध्ये इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम आशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी महाबळेश्वर नगरीतील माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका व विविध पक्षांचे पदाधिकारी ,पत्रकार बांधव ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin