Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

*महाबळेश्वर प्रेमी ग्रुपतर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा-२०२५’ कार्यक्रम उत्साहात*



 *महाबळेश्वर प्रेमी ग्रुपतर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा-२०२५’ कार्यक्रम उत्साहात*
महाबळेश्वर टाईम्स
 *संदिप देवकुळे महाबळेश्वर :* 
महाबळेश्वर प्रेमी ग्रुपतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘सन्मान स्त्रीशक्तीचा-२०२५’ हा कार्यक्रम यंदा सलग तिसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. ज्या मध्ये सर्व धर्मीय महिलांची उपस्थिती ठरली 
सर्व धर्म समभावचं प्रतिक. ९ दिवसांच्या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, ट्रेझर हंट तसेच महिला, पुरुष व शालेय विद्यार्थीनींसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचा भव्य समारोप  कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये महिलांसाठी फनी गेम्स, रास-गरबा-दांडियाचे खास नियोजन करण्यात आले होते.विजेत्यांच्या पारितोषिक वितरणाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये ..  रांगोळी स्पर्धा  सौ.जान्हवी धोत्रे,  सौ.निलम चिकने , सौ. रुची पल्लोड, सौ .रेवती  बगाडे यांनी अनुक्रमे प्रथम. द्वितीय. तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले..
पाककला स्पर्धेमध्ये  सौ.सविता येवले..  श्रीमती लीला ताई शिंदे, सौ.गीत नागपाल यांना.प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक पटकावले.
प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये सौ जान्हवी धोत्रे व सौ स्वाती धोत्रे ही जोडी विजेती ठरली.. तर ट्रेजर हंट या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये सौ.रुची अंकित पलोड व सौ. जान्हवी धोत्रे विजेत्या ठरल्या... आणि ग्रँड फिनाले च्या विजेत्या ठरल्या. सौ. मनिषा उतेकर प्रथम. सौ. रेश्मा जाधव द्वितीय व सौ. रेवती बगाडे तृतीय 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेते राहुल पद्मिनी नवनाथ राजे यांनी केले. या कार्यक्रमासाठी  महाबळेश्वर प्रेमी मधील सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.
 महाबळेश्वर मधील सर्व महिलांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे ‘जागर स्त्रीशक्तीचा-२०२५’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान सोहळा झाला.