Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर पालिकेसाठी अंदाजे ८३ टक्के मतदान

 *महाबळेश्वर पालिकेसाठी  अंदाजे ८३ टक्के मतदान*🗳️✍️ महाबळेश्वर टाईम्स


महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेसाठी आज ८३ टक्के मतदान झाले.12 हजार 704 मतदारांपैकी  10 हजार 547 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन म्हस्के व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी महाबळेश्वर वासियांचे आभार मानले.महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद निवडणुकीत मतदान दुपारपर्यंत संत गतीने सुरू होते.दुपारनंतर मतदार घराच्या बाहेर पडून उत्साहाने मतदान मतदान केले. दहा प्रभागासाठी 17 ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आले होते. दुपारनंतर मतदाराने मतदान करण्यासाठी आपल्या आपल्या प्रभागांमध्ये असणाऱ्या बुथ मध्ये मतदानासाठी गर्दी केली होती. वाढीव  झालेल्या 83 टक्के  मतदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सकाळपासूनच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर येथील प्रत्येक मतदान केंद्राची आज पाहणी केली. 

 



उद्या रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून वाढलेला मतदानाचा टक्का कुणासाठी फायदेशीर कोणासाठी तोट्याचे ठरेल याकडे महाबळेश्वरकरांचे लक्ष लागून राहिले आहे