मतदान केंद्र परिसरात मोबाईल वापरास बंदी
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया ही 20 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र परिसरात मोबाईल वापरास बंदी लागू करण्यात आलेली आहे. मतदानाची गोपनीयता व सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना त्यांचे मोबाईल सुरक्षित ठेवता यावेत, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ट्रेची व्यवस्था पोलिस कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मतदारांनी मतदानाच्या वेळी आपला मोबाईल ट्रेमध्ये ठेवून आपला मतदानाचा हक्क बजवावा.
मतदान केंद्र परिसरात मोबाईल वापर आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मतदानाची प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि गोपनीयतेने पार पाडण्यासाठी मतदार व सर्व संबंधितांनी नियमांचे पालन करून सहकार्य द्यावे, असे आवाहन महाबळेश्वरच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :- राहुल शेलार
मो.नं 9422604420
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
मो.नं : 9403546485


Social Plugin