*गोगावे येथे 1 ते 5 डिसेंबर कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*
महाबळेश्वर टाईम्स : प्रतिनिधी ✍️
ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड सप्ताहाचे 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत गोगावे ता. महाबळेश्वर येथे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण सप्ताहाचे उद्घाटन मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी खासदार नितीन पाटील उपस्थित असणार आहेत.
सोमवार दि. 1 डिसेंबर रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बावळे, मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी ह.भ.प. कवीराज महाराज झावरे, बुधवार दि.3 डिसेंबर रोजी ह.भ.प. कांचनताई शेकळके, गुरुवार दि. 4 डिसेंबर रोजी ह.भ.प. शिवलीलाताई पाटील व शुक्रवार दि. 5 डिसेंबर रोजी ह.भ.प. भरत महाराज शिंदे यांचे किर्तन होणार आहे.
गोगावे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी या ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिमान सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ गोगावे, मुंबई, माऊली मंडळ गोगावे, जिजामाता महिला मंडळ गोगावे यांनी केले आहे.


Social Plugin