महाबळेश्वर टाईम्स
भारतीय रिझर्व्ह बँकेचे दि महाबळेश्वर अर्बन को-ऑप बँक लि. महाबळेश्वर बँकेवरील सर्व निर्बंध शिथिल... चेअरमन -श्री. समीरभाई सुतार MAHABALESHWAR TIMES 📰संपादक राहुल शेलार 🗞️कार्यकारी संपादक रियाज मुजावर
महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असलेली दि महाबळेश्वर अर्बन को-ऑप बँक लि. महाबळेश्वरया बँकेवर भारतीय रिझव्र्ह बँकेने सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क (SAF) नुसार लागु केलेले सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे गत चार वर्षापासून बंद असलेले तारणी कर्ज सभासदांसाठी सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाचे सभेमध्ये घेणेत आला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री. समीरभाई सुतार यांनी दिली. अर्थिक वर्ष २०२४ -२०२५ अखेरचे भारतीय रिझर्व्ह बँकेकडुन तपासणी झाली असून व वैधानिक लेखापरिक्षण ही पुर्ण झालेले आहे.बँकेच्या अर्थिक स्थितीचा रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी आढावा घेवून गत चार वर्ष लागु केलेले सर्व निर्बंध मागे घेतलेले आहेत. त्यामुळेच बँकेच्या संचालक मंडळाने कर्ज सुविधा सुरू करण्याचा निर्णय प्राधान्याने व तत्परतेने घेतलेला आहे. कर्जाची वेळेत व नियमितपणे परतफेड केलेल्या सभासदांनी सदर कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून गेल्या चार वर्षापेक्षा जास्त काळ सर्वांच्या सहकार्याने बँकेचा कारभार पारदर्शक व सर्वसमावेशक कारभार सुरू आहे असाविश्वास व्यक्त केला आहे.
. सदर निर्णयाचे सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक व ग्राहकांकडुन स्वागत करून संचालक मंडळाचे पेढे वाटून अभिनंदन करणेत आले. यावेळी उपाध्यक्ष श्री. शरद बावळेकर, संचालक श्री. राजेश कुंभारदरे, श्री. दत्तात्रय वाडकर, श्री. सतीष ओंबळे, श्री. चंद्रकांत बावळेकर, श्री. नदीम शारवान, श्री. संपत जाधव, श्रीमती उषा ओंबळे, सौ. मनिषा पारठे, श्री. जावेद वलगे, श्री. अनिलसाळुंखे, श्री. प्रशांत कात्रट, श्री. मिलींद ढेबे, श्री. विजयकुमार दस्तुरे व मुख्य व्यवस्थापक फकिर मोहमद वलगे व सेवक वर्ग उपस्थित होते



Social Plugin