Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

. महाबळेश्वर अर्बन को-ऑप. बँकेची वार्षीक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न*

 *दि. महाबळेश्वर अर्बन को-ऑप. बँकेची वार्षीक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न*

महाबळेश्वर टाईम्स ✍️

महाबळेश्वर : प्रतिनिधी 


  दि. महाबळेश्वर अर्बन को-ऑप. बँक लि; महाबळेश्वर या   संस्थेची ९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा   आराम हॉटेल,   महाबळेश्वर येथे बँकेचे अध्यक्ष   समीर   सुतार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणा संपन्न झाली. 


 सुत्रसंचलन मुख्य व्यस्थापक फकिर भाई वलगे यांनी केले.  उपस्थिताचे स्वागत संचालक चंद्रकांत (सी डी ) बावळेकर ,  चेअरमन समीर सुतार यांनी बॅकेच्या वाटचालीची माहिती सभासदांना दिली. यानंतर  अहवाल वाचन सतिश ओंबळे, दिवगंताना प्रशांत कात्रट यांनी श्रद्धांजली वाहिली जावेद वलगे यांनी आभार प्रदर्शन केले.


               या  सभेत  मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.   दि. महाबळेश्वर अर्बन को-ऑप. बँकेच्या    संचालक मंडळाने सादर केलेला सन २०२४-२०२५   अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास स्विकृती देणे.     सन २०२४-२०२५ साल अखेरच्या नफा वाटणीस संचालक मंडळाने शिफारस केले त्यास मान्यता देणे.     सन २०२५-२०२६ चे अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन २०२४-२०२५ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा ज्यादा झालेल्या खर्चास मान्यता देणे.     बँकेचा सन २०२४-२०२५ सालचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील पूर्तता अहवालाची नोंद घेणे.   २०२५-२०२६ सालाकरिता वैधानिक लेखापरीक्षण यांचे नियुक्तीस कार्योत्तर मंजुरी देणे.    सामोपचार कर्ज परतफेड योजनेअंतर्गत बंद केलेल्या कर्ज खात्यांस मान्यता देणे तसेच  बाहेरील कर्ज उभारणीची मर्यादा ठरविणे. या विविध विषयांवर सभेत चर्चा करुन मंजुरी देण्यात आली. सभेमध्ये अध्यक्षांच्या अनुमतीने   विषयांवरील चर्चा करण्यातआली.  तसेच सदर सभेत सभासद समूह अपघात विमा योजनेमधून रुपये तीन लाखाचा धनादेश मेहरबानु खारकंडे यांच्या वारसांना वितरीत करण्यात आला.



सदर सभेस दि. महाबळेश्वर अर्बन को-ऑप. बँकेचे चेअरमन समीर सुतार , व्हा चेअरमन शरद बावळेकर , संचालक राजेश कुंभारदरे, दतात्रय वाडकर, सतीश ओंबळे, चंद्रकांत बावळेकर , नदीम शारवान  , संपत जाधव , संचालिका मनिषा पारठे , उषा ओंबळे व संचालक  जावेद वलगे , अनिल सांळुखे , प्रशांत कात्रट , मिलिंद ढेबे , ॲड विजय कुमार दस्तुरे, तसेच या सभेस नगरसेवक अफजलभाई सुतार , आबा शिंदे , ॲड संजय जंगम ,  प्रभाकर कुंभारदरे, प्रभाकर देवकर ,असिफ मानकर चेअरमन जनता नागरी सहकारी पतसंस्था, विजय नायडू , राजेंद्र पवार , अशोक शिंदे इत्यादी  मान्यवर सभासद , महिला सभासद  तसेच  मुख्य व्यवस्थापक फकीरमोहंमद वलगे , आनंद बन्से यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.



             

                बातम्या व जाहिरातीसाठी 

                              संपर्क

                  संपादक :-  राहुल शेलार 

                   मो.नं 9422604420

   कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

               मो.नं :  9403546485