महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
गिरीस्थान महाबळेश्वर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार तर नगरसेवक पदासाठी ६१ उमेदवार मैदानात उतरले होते. सुनिल शिंदे यांनी शेवटच्याक्षणी प्रचारात आघाडी घेऊन नगराध्यक्ष पद खेचून आणले. यासाठी त्यांना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची मोलाची साथ मिळाली. श्री. शिंदे यांची थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड झाली आहे. महाबळेश्वरमध्ये पुन्हा एकदा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा करिष्मा पाहायला मिळाला
महाबळेश्वर नगर नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मिळालेली मते पुढील प्रमाणे. सुनिल लक्ष्मण शिंदे - ४६४७, कुमार गोरखनाथ शिंदे – ३१८९, दत्तात्रय मारुती बावळेकर – २५३८, संजय गिरीधर पाटील – १३०, सतिश हणमंत सांळुखे - २९ व नोटा – ४३.
नगरसेवकपदाकरिता प्रभाग क्र. १ अ) विजयी उमेदवार राजू ईस्माईल नालबंद - ५२३ , युसुफ हसन शेख - ३५२ शंकर दगडू ढेबे - १९७ व नोटा – ४. विजयी उमेदवार विद्या शरद बावळेकर – ३५६, नावेज अजरुद्दीन बडाणे – ३०६ प्रियांका अजित बावळेकर – २१७, झीनत याकुब चौगुले – १८८ व नोटा – ९. प्रभाग क्र.२ अ) विजयी उमेदवार संतोष मारुती अखाडे – ३५५, असिफ सत्तार शेख – २७५, प्रशांत महादेव अखाडे – ९९, किरण शंकर काळे – ७७ व नोटा – १. ब) विजयी उमेदवार संगिता दत्तात्रय वाडकर – ६०६, सोनाली रोहित बांदल – १९३ व नोटा – ८. प्रभाग क्र. 3 अ) विजयी उमेदवार विमल पांडुरंग पार्टे – ८२१, पुजा तुषार उतेकर – ४५१ व नोटा – १६. ब) विजयी रविंद्र मधुकर कुंभारदरे – ४५३, हेमंत (सोनु) बाळकृष्णा साळवी – ४५०, विशाल रतिकांत तोष्णीवाल – ३८० व नोटा – ५.
प्रभाग-४ अ) विजयी उमेदवार कुमार गोरखनाथ शिंदे – ५४८, संजय रामचंद्र कदम – १९२, बाळकृष्ण बबन सांळुखे – ६८ किरण गोरखनाथ शिंदे - ५९ व नोटा – १३. ब ) विजयी उमेदवार विमल पांडुरंग बिरामणे - ४७८, वंदना मनिष ढेबे – ३८०, शर्मिला हणमंत वाशिवले – १३ व नोटा – ९, प्रभाग क्र ५ अ) विजयी उमेदवार स्मिता सुनिल पाटील – ५२१, अपर्णा अतुल सलागरे – ३०३, सना साकिब शेख – १७५, प्रभा विजय नायडू – १२६ व नोट – ७. ब) विजयी संजय बाळकृष्ण जंगम – ६०१, राजेश विश्वनाथ कुंभारदरे – ४९०, प्रतिक सुरेश जंगम – ३१ व नोटा - १०
प्रभाग क्र.६ अ) विजयी निता आकाश झाडे - ६१५, उषा किशोर कोंडके – ४९५ व नोटा – ९. ब) संतोष मारुती शिंदे – ६४८, राहुल अशोक भोसले – २५२, दुर्वेश चंद्रकांत प्रभाळे – १८६, मनोहर मारुती जाधव – २९ व नोटा – ४. प्रभाग क्र ७ अ )विजयी उमेदवार शबाना अल्ताफ मानकर – ५३६, तरन्नुम अफजल वलगे – ५२३ व नोटा – ५. ब ) विजयी उमेदवार नासिर युनुस मुलाणी – ८०३, सलिम जब्बार बागवान – २५३ व नोटा – ८. प्रभाग क्र. ८ अ) विजयी उमेदवार प्रियंका अक्षय वायदंडे – ४६९, स्वप्नाली कुमार शिंदे – ४६३, शुभांगी किरण शिंदे – २४८ व नोटा – ४. ब) विजयी उमेदवार राहुल प्रकाश पिसाळ – ७८३, संगिता प्रमोद गोंदकर - ३८६ व नोटा – १५.
प्रभाग क्र ९ अ) विजयी उमेदवार रेश्मा किरण ढेबे – ६२६, संगिता प्रकाश हिरवे – ४२४, मेघा सुहास ढेबे – ३५ व नोटा – ३. ब) अफजल मुबारक सुतार – ६११, अशिष संतोष चोरगे – २४१, मोअज्जम ताजुद्दीन नालबंद – २२७ व नोटा – ९. प्रभाग क्रमांक १० अ) विजयी उमेदवार पल्लवी संदिप कोंडाळकर – ४०२, सुनिता संदीप आखाडे – २१६, सिमा संदिप तोडकर – १२६, सुनिता दत्तात्रय ढेबे – १०१, अश्विनी अशोक ढेबे – ८९ व नोटा – ४. ब) विजयी उमेदवार रोहित बबनराव ढेबे - ६२३, विनोद श्रीरंग गोळे - २७३, मनिष गोविंद मोहिते – ३६ व नोटा – ६ या प्रमाणे नगर सेवक पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मते मिळाली आहेत.





Social Plugin