छत्रपती प्रतापसिंह महाराज गार्डन शुल्क आकारणीच्या विरोधात डोमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संघटना करणार आंदोलन.....
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर येथे छत्रपती प्रतापसिंह महाराज गार्डन या ठिकाणी हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात त्याच ठिकाणी महाबळेश्वर येथील स्थानिक नागरिकही येत असून त्यांच्याकडून २० रुपये शुल्क आकारणीला सुरुवात केली आहे. या विरोधात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी आंदोलन करणार असल्याचे निवेदन वन विभागाला दिले आहे.
यावेळी जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, शहर महिला अध्यक्ष सायराताई शेख तसेच सरचिटणीस नुरजहाताई खारकंडे, मोहन कारंडे उपस्थित होते.
महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून 20 रुपये शुल्क आकारले जातात. स्थानिक नागरिकांकडून शुल्क आकारले जाऊ नयेत या संदर्भाचे निवेदन वन विभागाला दिले. याआधी दोन ते तीन महिन्यापासून महाबळेश्वरच्या स्थानिक नागरिकांकडून पैसे घेतले जात होते. संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी. असेही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.




Social Plugin