महाबळेश्वर टाईम्स
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश
एकेरी स्वतंत्र मार्गिका रस्ता व कमानी पुलाच्या कामाला सुरुवात
काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांना आणि नागरिकांना मिळणार दिलासा
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील वेण्णा लेक येथील मुख्य प्रवेशद्वारावर पर्यटन होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी स्वतंत्र मार्गिका (बायपास) रस्ता व कमानी पुलाच्या उभारणीला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने वन विभागाने मंजूरी दिली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील नेहमीच वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडवण्यासाठी बायपास रस्ता आणि कमानी पुलाच्या बांधकामाला अंतिम मंजुरी मिळाली असून, यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची प्रचंड गर्दी होते, ज्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी वेण्णा लेकपासून एक बायपास रस्ता तयार करण्याची योजना आहे, जो धनगरवाडीमार्गे मुख्य रस्त्याला जोडला जाईल.
या बायपास मार्गावरील मुख्य रस्ता आणि कमानी पुलाच्या बांधकामातील सर्व अडथळे दूर झाले आहेत आणि शासनाने या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पामुळे वेण्णा लेक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल.
हे काम पूर्ण झाल्यानंतर, उन्हाळ्यातील आणि इतर सुट्ट्यांमधील गर्दीच्या काळात वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :- राहुल शेलार
मो.नं 9422604420
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
मो.नं : 9403546485




Social Plugin