Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

शैक्षणिक सहली आणि पर्यटकांनी महाबळेश्वर गजबजले पण वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा

 शैक्षणिक सहली आणि पर्यटकांनी महाबळेश्वर गजबजले पण वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा

महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर दि २८ (प्रतिनिधी) संदेश भिसे✍️



          महाराष्ट्राचे नंदनवन तसेच पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर सध्या शैक्षणिक सहली तसेच पर्यटकांनी बहरले असून नाताळ व नववर्षाच्या स्वागत साठी तसेच महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य पाहण्या साठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी पहावयास मिळत आहे येथील ऑर्थरसिट पॉईंट लॉडविक विल्सन पॉईंट मुंबई पॉईंट  पर्यटकांनी हाउस फुल होताना दिसत आहे . नववर्षाच्या स्वागत साठी पर्यटकांना मेजवानी देण्या साठी महाबळेश्वर पाचगणी तापोळा येथील विविध रिसॉर्ट सज्ज झाले आहेत तर नव वर्षाचा स्वागत साठी महाबळेश्वर पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे .

       क्षेत्र महाबळेश्वर येथील पुरातन स्वयंभू शंकराचे मंदिर तसेच पंचगंगा मंदिर येथे दर्शन घेण्या साठी पर्यटक आवर्जून रांग लावत आहेत तर येथील ऑर्थरसिट लॉडविक स्केट्स अशा विविध पॉइंट्स वरतून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पर्यटकांच्या डोळ्याच पारण फेडत आहे संध्याकाळी येथील मुंबई पॉईंट येथून दिसणार सुर्यास्ताचा विहंगम नजारा पाहण्यात पर्यटक रमून जाताना दिसत आहे . विविध पॉइंटस वर घोडस्वारीचा आनंद घेत तर येथील प्रसिद्ध वेण्णा लेक येथे नौका विहाराचा आनंद घेण्या साठी येथील बुकिंग काउंटर वरती पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत येथील प्रताप सिंह पार्क येथे लहान मुले वृद्धांसाठी निवांत वेळ घालवणे साठी पहिली पसंती ठरत आहे .येथील मुख्य बाजारपेठ येथे असणाऱ्या दुकानांमधून पर्यटक खरेदीचा मनमुराद आनंद लुटत आहेत तर येथील खाद्यपदार्थाचे स्टॉल रेस्टॉरंट येथे खाद्य पदार्थांवरती ताव मारण्या साठी पर्यटक गर्दी करीत आहेत . 


वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा 

           वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटक हंगाम असताना देखील योग्य वाहतूक व्यवस्थापन नसल्याने तासंतास पर्यटकांना स्थानिकांना ट्रॅफिक मधे अडकून राहावे लागत आहे. वेण्णा लेक कर संचलन केंद्र , लिंग मळा फाटा, बाळासाहेब ठाकरे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आराम खिंड माखरिया गार्डन येथे बऱ्याचदा वाहतूक ठप्प होताना दिसून येत आहे तर नो एन्ट्री नो पार्किंग तसेच एकरी वाहतूक हे फक्त फलकांवरती दिसून येत असून वास्तवात त्याची अंमलबजावणी होत नाहीये याचबरोबर लिंगमळा रस्ता नाकिंदा ते अवकाळी असे पर्यायी मार्ग असून देखील त्याची दगडुजी नसल्याने व त्याचा योग्य वापर करून घेता येत नसल्याने पाचगणी महाबळेश्वर या मुख्य रस्त्यावरती वाहतुकीचे ताण जाणवत आहे . तर महाबळेश्वर शहरातील विविध चौक महत्त्वाचे रोड येथील वाहतूक व्यवस्थापन व एकेरी वाहतूक व्यवस्थापन याबाबत अंमलबजावणी केल्यास बऱ्याचशा ट्रॅफिक वरचा ताण कमी होणार आहे यातच विविध मुख्य रस्त्यांवरती बंद अवस्थेतील स्कूल बस इतर गाड्या विशिष्ट ठिकाणी हलवण्यास पार्किंगची बरोबरच वाहतुकीची समस्या सोडवता येणार आहे . भविष्यात एकेरी वाहतुकीचे व्यवस्थापन योग्यरीत्या केल्यास बऱ्याच प्रमाणात ट्रॅफिक ची समस्या सोडवण्यात यश येईल ३१ डिसेंबर साठी येथील विविध पॉइंट्स वरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलिस प्रशासन तसेच वनविभागाची करडी नजर असणार आहेत तर . तर पर्यटकांना कढून  देखील वाहतुकीचे नियम पाळले गेल्यास सर्वांनाच सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे .