Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

मा. नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांचा भाजप मध्ये प्रवेश

महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांचा भाजप मध्ये  जाहीर प्रवेश 


महाबळेश्वर टाईम्स

 महाबळेश्वरचे शिवसेना उबाठा गटाचे नेते डी.एम.बावळेकर यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश! 


सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रसिहराजे भोसले,जिल्हाध्यक्ष आ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश 


येणाऱ्या काळात महाबळेश्वर तालुक्यामध्ये 'कमळ' फुलविणार-डी.एम.बावळेकर

 भारतीय जनता पक्ष भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून अव्वल स्थानावर आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विकास आणि राष्ट्रवादावर भर देऊन त्याचे महत्त्व झपाट्याने वाढले आहे. आज भाजप हा राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या एक शक्तिशाली आणि सुसंघटित पक्ष आहे.                                                           केंद्रात,राज्यात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते.सातारा जिल्ह्यातही भाजपचे  वर्चस्व मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात भाजप पक्षामध्ये आता इनकमिंग सुरु झाली आहे. महाबळेश्वरचे  डी.एम.बावळेकर यांनी शिवसेना उबाठा गटाला रामराम करत  भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.



      येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात भाजपने आपली ताकद  भक्कम केली आहे.अशातच महाबळेश्वर मध्ये शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे.डी.एम.बावळेकर यांचा पक्षप्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.या प्रवेशामुळे  महाबळेश्वर तालुक्यात आता राजकीय समीकरणांमध्ये महत्वाचा बदल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.भाजप प्रवेशामुळे येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या राजकारणाला नवं वळण मिळणार, हे मात्र निश्चित आहे.  यावेळी बोलताना डी.एम.बावळेकर म्हणाले,नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने सगळीकडे वर्चस्व निर्माण केलं आहे. महाबळेश्वर शहर, महाबळेश्वर तालुका विकासापासून वंचित राहिला आहे.ग्रामीण भागांमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.आम्ही महाबळेश्वर नगरपालिका निवडणुक कमळावर लढवली असती तर आम्ही जिंकलो असतो.महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीत प्रथमच 'कमळ' फुललं.येणाऱ्या काळात महाबळेश्वर तालुक्यामध्ये 'कमळ' फुलविणार असल्याचे डी.एम.बावळेकर यावेळी बोलताना सांगितले.   यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.अतुलबाबा भोसले,माजी आ.मदनदादा भोसले,माजी आ.आनंदराव पाटील,सुरभी भोसले सुनिल काटकर,चिन्मय कुलकर्णी, भाजपचे मा.जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,साताऱ्याचे नवनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांसह भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.