*अहिर मुरा येथे दोन बिहारी कामगारांचा मृत्यू*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिर मुरा ता.महाबळेश्वर येथे बांधकाम कामगार राहत असलेले कंटेनरमध्ये पेटलेला कोळसा घमेले मध्ये घेऊन पायाखाली ठेवून झोपलेले दोन कामगारांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे.
मोतीलाल रहमान वय 53 रा. सिस्वा बिहार. विपिन तिवारी वय 55 राहणार गोपालगंज बिहार अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
हे मृत व्यक्ती सकाळी बेशुद्ध अवस्थेत मिळाले म्हणून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत झाल्याचे घोषित केले.


Social Plugin