Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

सुनिल शिंदे यांनी महाबळेश्वरच्या नगराध्यक्ष पदाचा स्विकारला पदभार

 सुनिल शिंदे यांनी नगराध्यक्ष पदाचा  स्विकारला  पदभार

महाबळेश्वर टाईम्स



   जनतेतून नगराध्यक्ष झालेल्या सुनील शिंदे यांनी महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  




  नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळ्यासाठी  खासदार नितीन काका पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, संजय गायकवाड नवनिर्वाचित नगरसेवक नासीर मुलाणी, अफजल सुतार, संतोष आबा शिंदे, रवींद्र कुंभारदरे, संतोष आखाडे, विमल  पार्टे, संगीता वाडकर,  संजय जंगम, रोहित ढेबे, राहुल पिसाळ, पल्लवी कोंढाळकर, विद्या बावळेकर, प्रियंका वायदंडे, रेश्मा ढेबे, स्मिता पाटील तसेच आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, टॅक्सी युनियन, मा नगराध्यक्ष युसूफ शेख ,शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, यशवंत भिलारे, वाळिंबे सर, डी एल शिंदे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  फकीर भाई वलगे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केलेउपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष श्री. शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.