*नागरिकांकडून होत आहे कौतुक*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील कृष्णा पवार हिने हरियाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल क्लासिक इक्विपेड बेंच प्रेस या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले. या बद्दल कृष्णाचे महाबळेश्वर परिसरात नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पॉवर लिफ्टिंगमधील ही स्पर्धा देशातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित स्पधपैकी एक मानली जाते. या स्पर्धेसाठी कृष्णाची महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्य संघात निवड झाली होती. यापूर्वी पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे पार पडलेल्या 'इंडियन ओपन पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ खेलोत्सव' या स्पर्धेत कृष्णाने गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.



Social Plugin