Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

क्षेत्रमहाबळेश्वर येथे महाशिवरात्र उत्साहात

 क्षेत्रमहाबळेश्वर येथे महाशिवरात्र उत्साहात साजरी

महाबळेश्वर टाईम्स

​महाबळेश्वर प्रतिनिधी         


                          क्षेत्र महाबळेश्वर येथील भगवान शंकराचे  एक अत्यंत पवित्र, प्राचीन आणि ऐतिहासिक स्वयंभू शिवमंदिर आहे 
      'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाणारे  क्षेत्रमहाबळेश्वर येथील महादेवाचे मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्ती आणि चैतन्याने न्हाऊन निघाले आहे. निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम असलेल्या या क्षेत्रात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी  भाविकांच्या रांगा लागल्या आहेत

​प्राचीन वारसा ​यादवकालीन स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण असलेले हे मंदिर आपल्या हेमाडपंथी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. काळ्या दगडातील भव्य रचना आणि शांत परिसर भाविकांना आत्मशांतीचा अनुभव देतो. गाभाऱ्यातील स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येथे दाखल झाले आहेत.


​पंचगंगा नदीचे उगम आणि धार्मिक महत्त्व आहे 

क्षेत्र ​महाबळेश्वरचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे होणारा पाच नद्यांचा उगम. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या नद्यांचा उगम आणि संगम याच पवित्र क्षेत्रात होतो. गायीच्या मुखातून वाहणाऱ्या जलाच्या प्रवाहातून कृष्णा नदी उगम पावते, अशी श्रद्धा असल्याने या स्थानाला विशेष असे पवित्रत्व प्राप्त झाले आहे.

​उत्सवाचे स्वरूप आणि धार्मिक विधी 

​महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

​पहाटेचा रुद्राभिषेक: पहाटेपासूनच महादेवाला अभिषेक आणि बिल्वपत्र अर्पण करण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत.

​मंत्रोच्चार: 'ॐ नमः शिवाय' च्या जयघोषाने आणि अखंड हरिनाम-स्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. तहसिलदार सचिन मस्के यांनी येथे भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले त्याच प्रमाणे अनेक सेवाभावी संस्था ,क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान समिती,


 व आर डी ग्रुपचे संस्थापक नगसेवक रोहित ढेबे यांच्या मार्फत भाविकां करिता प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस दला मार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे