*महाशिवरात्रीचे औचित्य साधून चर्मकार समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (सातारा)
महाबळेश्वर येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून चर्मकार समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
हे रक्तदान शिबिर रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० ते सायं. ५ पर्यंत शंकर पार्वती मंदीर गवळी आळी, महाबळेश्वर होणार आहे.
रक्तदान शिबिराचे आयोजन श्री. शंकर पार्वती ट्रस्ट, महाबळेश्वर समस्त चर्मकार समाज, महाबळेश्वर, महाशिवरात्र उत्सव समिती, महाबळेश्वर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
तुमच्या रक्ताच्या काही थेंबानी तुम्ही एखाद्याला नवजीवन देऊ शकता. यामुळे महाबळेश्वरवासीयांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आव्हानही करण्यात आले आहे.


Social Plugin