Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर शिवसेना आक्रमक; आठ दिवसांत शवाहिनी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

 महाबळेश्वर  शिवसेना आक्रमक; आठ दिवसांत शवाहिनी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

 महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

महाबळेश्वर शहरात गेल्या वर्षभरापासून पालिकेकडे हक्काची शवाहिनी  उपलब्ध नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे निर्माण झालेली ही गैरसोय दूर करण्यासाठी महाबळेश्वर शहर शिवसेना आक्रमक झाली असून, येत्या आठ दिवसांत शवाहिनी उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी  नगरसेवक  संतोष(आबा)शिंदे, नगरसेवक संतोष आखाडे उपस्थिती होते.




शहरात एखादी दुःखद घटना घडल्यास पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पालिकेकडे वाहन उपलब्ध नाही. यामुळे अंत्यविधीवेळी नातेवाईकांना खासगी वाहनांची जुळवाजुळव करताना प्रचंड धावपळ आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले की, याबाबत प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊनही या गंभीर विषयाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे.

शिवसेनेचा अल्टिमेटम

शिवसेना शहर प्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की:

दुःखद प्रसंगी नातेवाईकांची होणारी गैरसोय ही माणुसकीला धरून नाही. नगरपालिकेने गांभीर्याने विचार करून एका आठवड्याच्या आत शहरासाठी नवीन शवाहिनी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शहरवासीयांना होणारा त्रास थांबेल.


निवेदन देता प्रसंगी शिवसेनेचे  विजयभाऊ नायडू, राजेंद्र पंडित,राहुल साळुंखे,सचिन गुजर,सचिन ओतारी,वर्षा आरडे,सुनीता फळणे,पूजा उतेकर,शितल ओतारी,प्रभा नायडू उपस्थित होते.


महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळावर जिथे मूलभूत सुविधांची गरज असते, तिथे अंत्यविधीसाठी लागणाऱ्या किमान सुविधेचा अभाव असल्याने आता शहरवासीयांमधूनही संताप व्यक्त होत आहे. आता पालिका प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क


           संपादक :- राहुल शेलार 


              📱 9765576377


    कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 


              📱9403546 485