Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर येथे २५ फेब्रुवारीला भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन

 महाबळेश्वर मध्ये २५ फेब्रुवारीला भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन



महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर (संदेश भिसे) 

     सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व मसल फॅक्टरी महाबळेश्वर यांच्या वतीने सलग ६ व्या वर्षी महाबळेश्वर श्री २०२६” या भव्य शरीरसौष्ठव व मेन्स फिजिक्स स्पर्धेचे आयोजन बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस चौक महाबळेश्वर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागाची संधी देण्यात आली आहे. 


तर या स्पर्धेच्या महाबळेश्वर श्री २०२६ चा मान पटकावणाऱ्या स्पर्धकास ₹११,१११/-,उपविजेता : ₹२,२२२/-, बेस्ट पोझर : ₹२,२२२/- बेस्ट मस्क्युलर : ₹२,२२२/-, मिळणार आहे .


प्रत्येक वजन गट व पारितोषिके (प्रत्येक गटासाठी)

५० ते ५५ किलो गट,५५ ते ६० किलो गट,६० ते ६५ किलो गट,६५ ते ७० किलो गट,७० ते ७५ किलो गट,७५ ते ८० किलो गट, ओपन गट (८० किलोवरील). मेन्स फिजिक्स गट व प्रत्येक गटासाठी पारितोषिके : प्रथम क्रमांक : ₹४,०००/-, द्वितीय क्रमांक : ₹३,०००/-, तृतीय क्रमांक : ₹२,५००/-,चतुर्थ क्रमांक : ₹२,०००/-,पंचम क्रमांक : ₹१,०००/-,सहावा क्रमांक : प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे महाबळेश्वर मध्ये या स्पर्धेच्या आयोजनाचे सलग ६ वे वर्ष असून क्रीडाप्रेमीं मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.

                           बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क


                                     संपादक :- राहुल शेलार 


                                         📱 9765576377


                               कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 


                                         📱 9403546 485