महाबळेश्वर अर्बन बॅक परिवरा तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या अर्बन बॅक परिवारा तर्फे दि 18/3/2026 रोजी इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते रमजान च्या पवित्र महिन्या मध्ये मुस्लिम बांधव रोजे (उपवास) ठेवतात पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने अर्बन बँकेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते माजी चेअरमन युसूफ भाई शेख यांनी रमजान महिन्याचे महत्व विषद केले या कार्यक्रमास व्यवसायिक व महाबळेश्वर शहरातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक तसेच हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर ,मा. उपनगराध्यक्ष अफजल भाई सुतार, नगरसेवक रोहित ढेबे प्रभाकर देवकर ,बॅकेचे चेअरमन चंद्रकांत बावळेकर व्हा चेअरमन नदीम शारवान माजी चेअरमन समीर सुतार , माजी व्हा.चेअरमन शरद बावळेकर, जावेद वलगे , सतिष ओंबळे,प्रशांत कात्रट , मिलिंद ढेबे, अनिल सांळुखे , संचालिका उषा ओंबळे , मनिषा पारठे , माजी संचालिका वृषाली डोईफोडे , मुख्य व्यवस्थापक फकिर वलगे, आनंद बन्से, अभिजित पोतदार ,श्रीकांत पारठे, अमर जाधव ,रोहन बन्से , आकाश ढेबे, यश बन्से , संजय जंगम, भरत जंगम , अमर बिरामणे, तसेच राजाभाऊ गुजर , शंकर ढेबे ,तौफीक पटवेकर तसेच टॅक्सी युनियनचे पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले
पत्रकार बांधव आदी मान्यवर उपस्थित होते.


Social Plugin