पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने श्री विघ्नहर्ता व्यापारी असोसिएशन मित्र मंडळ महाबळेश्वर तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन
March 20, 2026
पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने श्री विघ्नहर्ता व्यापारी असोसिएशन मित्र मंडळ महाबळेश्वर तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी विघ्नहर्ता व्यापारी असोसिएशन मित्र मंडळ, महाबळेश्वर तर्फे इफ्तार पार्टी चे आयोजन हॉटेल व्यकंटेश येथे करण्यात आले होते या इफतार पार्टी कार्यक्रमास हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते सर्व प्रथम अमित माळवदे यांनी उपस्थित मान्यवर तसेच मुस्लिम बांधवाचे स्वागत केले त्याच प्रमाणे महाबळेश्वर नगरपालिका गटनेते व नगरसेवक संजय जंगम यांनी सर्वाचे इफतार पार्टीस उपस्थित राहिल्या बद्दल आभार प्रदर्शन केले तसेच ईदच्या शुभेच्छा दिल्या माजी नगराध्यक्ष युसूफ भाई शेख यांनी रमजान महिना व रोजे ( उपवास ) या बद्दल माहिती दिली व मंडळचे इफतार पार्टी व विविध प्रकारचे सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले बाबत मंडळाच्या सदस्यांचे कौतुक केले व आभार मानले या कार्यक्रमास महाबळेश्वर नगरीचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे, उपनगराध्यक्ष नासिर भाई मुलाणी , अर्बन बॅक संचालक जावेद वलगे , मुनिरभाई सय्यद , तौफिक पटवेकर , कौसर भाई , नसिम पन्हाळकर , सलमान खाटीक, सचिन गुजर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित माळवदे मनिष साळुंखे सुमित क्षिरसागर ,प्रताप जाधव केतन शेटे गौरव वाईकर रोहन कोमटी कुणाल साळुंखे प्रवीण भांगडिया संजय तोडकर उमेश माळवदे प्रणव जंगम ऋषिकेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले


Social Plugin