Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर तालुक्यात 'महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा शुभारंभ; प्रशासकीय सेवा आता थेट जनतेच्या दारी*

 *महाबळेश्वर तालुक्यात 'महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा शुभारंभ; प्रशासकीय सेवा आता थेट जनतेच्या दारी* 

महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर : प्रतिनिधी 


महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या धोरणानुसार, महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये हे शिबीर पार पडणार असून, तहसीलदार सचिन मस्के यांनी नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

​प्रशासकीय कामांचा निपटारा 'एकाच छताखाली'

​या अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ वरील त्रुटी दूर करणे आणि विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करणे यांसारखी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. प्रामुख्याने खालील सुविधा उपलब्ध असतील:

​जमीन महसूल: भोगवटादार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि ७/१२ दुरुस्ती हेल्पडेस्क.

​तुकडेबंदी सवलत: दि. १५/११/१९६५ ते १५/१०/२०२४ दरम्यानच्या तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या नोंदी व फेरफार प्रकरणांवर कार्यवाही.

​विद्यार्थी व नागरिकांसाठी दाखले: उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रांचे वाटप. शाळांमध्ये कॅम्प लावून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जातील.

​इतर योजना: संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, घरकुल पट्टे वाटप आणि पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देणे.

​डिजिटल सेवा: ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, पी.एम. किसान आणि तक्रार निवारण या सेवा 'एक खिडकी' प्रणालीद्वारे मिळतील.

​शिबिरांचे वेळापत्रक (वेळ: सकाळी १०:०० वाजता)


वरील कामासाठी आयोजित करणेत आलेल्या शिबीराचे नियोजन पुढिलप्रमाणे आहे.


मंडल तापोळाःदि.07 मार्च 2026 ठिकाण तापोळा (पदमावती मंदिर) वेळ सकाळी 10.00 वा.


मंडल लामजः-दि. 14 मार्च 2026 ठिकाण उचाट (ग्रामपंचायत कार्या. परिसर) वेळ सकाळी 10.00 वा.


 मंडल पाचगणी:- दि. 10 एप्रिल 2026 ठिकाण भिलार (हनुमान मंदिर) वेळ सकाळी 10.00 वा.


मंडल महाबळेश्वरः- दि. 17 एप्रिल 2026 ठिकाण-मेटगुताड (ग्रामपंचायत कार्या. परीसर) वेळ सकाळी 10.00 वा.

 महाबळेश्वर नगरपरिषदः दि. 08 में 2026 ठिकाण-सेठ गंगाधर माखरिया हायस्कुल महाबळेश्वर वेळ-सकाळी 10.00 वा.


पाचगणी नगरपरिषदः दि. 15 मे 2026 ठिकाण-भिमनगर, सांस्कृतिक भवन पाचगणी वेळ सकाळी 10.00



अर्जाची प्रक्रिया आणि आवाहन

​शिबिराच्या दिवशी कामाचा जलद निपटारा व्हावा, यासाठी तालुक्यातील महसुली सजानिहाय गावी नियोजन बैठका सुरू आहेत. ज्या नागरिकांना लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज दिनांक ०६ मार्च २०२६ पर्यंत संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडलाधिकारी किंवा तहसील कार्यालयात जमा करावेत.

​"शासकीय सेवांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपली प्रलंबित कामे या माध्यमातून पूर्ण करून घ्यावीत."


बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क


            संपादक :- राहुल शेलार 


                 📱 9765576377


   कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 


                📱 9403546 485