महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प मंजूर; पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर भर
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकत्याच झालेल्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शहराचा सर्वांगीण विकास, पर्यटन वृद्धी आणि स्वछता व पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला आहे.सदर अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ करणेत आलेली नाही.
अर्थसंकल्पाचे आर्थिक स्वरूप:
नगरपरिषदेने मांडलेल्या या अंदाजपत्रकात एकूण १,६९,७३,५६,६८७/- (१६९.७३ कोटी) रुपये जमा अपेक्षित धरली असून, १,६९,६४,५०,०००/- (१६९.६४ कोटी) रुपये खर्चाची तरतूद केली आहे. यानुसार, हा अर्थसंकल्प ९,०६,६८७/- रुपयांच्या शिल्लकीचा आहे.
अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि प्रस्तावित कामे:
१. पर्यटन विकास व सुशोभीकरण: महाबळेश्वरमधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांचा विकास, पर्यटकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारणी करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.
२. रस्ते व पायाभूत सुविधा: शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण आणि पावसाळी गटारांची दुरुस्ती यांसाठी भांडवली खर्चातून मोठी तरतूद करण्यात आली आहे.
३. स्वच्छता व पर्यावरण: प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. माझी वसुंधरा योजने अंतर्गत शहरातील झाडांचे जतन आणि नवीन वृक्षारोपणासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल.
४. पाणीपुरवठा योजना: वाढती लोकसंख्या आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेता, शहराला अखंडित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांचे नूतनीकरण,करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण थकबाकी बाबत होणाऱ्या खर्चाची तूट भरून काढणेबाबत सखोल चर्चा करणेत आली.
*उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने करणेत आलेल्या तरतूदी*मध्ये प्रमुख्याने
शहरातील सर्व नवीन मिळकतीनां कर आकारणी करणे. मिळकत कर व पाणी पट्टी वसुली मोहीम राबवून उत्पन्न वाढवावे, तसेच म्हसुली तूट भरून काढणेबाबत ठोस उपाययोजना करावी असे अंदाजपत्रकावरील चर्चेत सहभागी सदस्यांनी प्रतिपादन केले.
या विशेष सभेत नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी विकासात्मक कामांना गती देण्याचे आश्वासन दिले.
श्री रोहित ढेबे, सभापती, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती यांनी नगर परिषद उत्पन्न वाढीबाबत प्रस्ताव सभागृहात मांडला .सदर प्रस्तावास श्री.संजय बाळकृष्ण जंगम,सभापती स्वच्छता, वैद्यक सार्वजनिक आरोग्य समिती समिती यांनी अनुमोदन दिले.श्री.कुमार शिंदे,विरोधी पक्षनेते यांनी नगरपरिषदेची महसूली तूट भरून काढणे बाबत सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित प्रयत्न करावे असे सुचविले.
*"महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेकडील उत्पन्न वाढीबरोबरच खर्चात काटकसर करून आर्थिक शिस्त ठेवणे हा प्रशासनाचा प्रधान्यक्रम राहील"* असे प्रतिपादन मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले.
*"हा अर्थसंकल्प शहराला विकासाकडे नेणारा असून, सामान्यांवर कोणताही कराचा बोजा न टाकता शहराचा सर्वागीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे,"* असे यावेळी श्री सुनिल शिंदे, नगराध्यक्ष,महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद यांनी नमूद केले .
यावेळी सर्व नगरपरिषद सदस्यांनी अंदाजपत्रकावरील चर्चेत सहभाग घेतला.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin