Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महिला दिनी आयोजित “देणे समाजाचे” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

 महिला दिनी आयोजित “देणे समाजाचे” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


महाबळेश्वर टाईम्स                                             महाबळेश्वर,  (प्रतिनिधी) :✍️ जागतिक महिला दिनानिमित्त डॉ अजित प्रभाळे यांच्या माई वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक सोसायटी, इनरव्हील क्लब महाबळेश्वर व रोटरी क्लब महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने “देणे समाजाचे” या विशेष कार्यक्रम व संवाद कार्यशाळेचे आयोजन हॉटेल पूनम सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.



यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते डॉ. श्याम बडवे, डॉ. अजित नरेंद्र प्रभाळे, इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे, रोटरी क्लब अध्यक्ष विजय काळे, पीडीसी रोहिणी वैद्य, दुर्वेश प्रभाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. श्याम बडवे यांनी कार्यशाळेमध्ये दोन पिढ्यांतील संवाद, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, व्यावसायिक-करिअर समतोल तसेच स्त्री-स्वातंत्र्य आणि आधुनिक विचार या विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमास शहरातील विविध सेवाभावी संस्था व संघटनांचे पदाधिकारी, तरुण-तरुणी तसेच महिला मंडळांच्या सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक माई वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अजित नरेंद्र प्रभाळे यांनी केले. सत्कार समारंभ रोटरी क्लब अध्यक्ष विजय काळे यांनी पार पाडला. तर आभार इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांनी मानले.

       या  कार्यक्रमास उपस्थित महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेच्या जेष्ठ नगरसेविका विमलताई पार्टे, तसेच स्मिता पाटील , पल्लवी कोंडाळकर , शबाना मानकर  यांचा सन्मान करण्यात आला.                                 तसेच डॉक्टर महेंद्र भिलारे व लेखक निलेश झोरे यांचा सन्मान करण्यात आला

या प्रसंगी प्रमुख  वक्ते डॉ. श्याम बडवे यांचा सत्कार इनरव्हील अध्यक्षा वर्षा पार्टे, रोटरी क्लब अध्यक्ष विजय काळे, पीडीसी रोहिणी वैद्य व दुर्वेश प्रभाळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास इनरव्हील क्लब, रोटरी क्लब तसेच माई वैद्यकीय सामाजिक व शैक्षणिक सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.