Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या शकुंतला चोरमले; उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय मोरे

 महाबळेश्वर पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या शकुंतला चोरमले; उपसभापतीपदी शिवसेनेचे  संजय मोरे


महाबळेश्वर टाईम्स



महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. या निवडीत सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शकुंतला रमेश चोरमले तर उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


या निवड प्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार सचिन मस्के तसेच गटविकास अधिकारी विजय विभुते यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.


महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात तळदेव गटात शिवसेनेने आघाडी घेतली होती, तर भिलार गटात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. या पार्श्वभूमीवर सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस तर उपसभापतीपदी शिवसेना असा समन्वय साधत दोन्ही पदांची बिनविरोध निवड करण्यात आली.


विशेष म्हणजे महाबळेश्वर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापती पद शिवसेनेच्या वाट्याला आल्याने   शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



या वेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ, बाबुराव संकपाळ, प्रवीण भिलारे, रमेश चोरमले, माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम जंगम, घनश्याम संकपाळ, विजय नायडु , प्रशांत कात्रट सुभाष कदम, गणेश उतेकर, नितीन दादा भिलारे, विठ्ठल दुधाने, महेंद्र पांगारे, सुभाष कारंडे, संभाजी भिलारे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते