चिखली शाळेतील स्वरा सुर्वे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड महाबळेश्वर टाईम्स
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली,तालुका महाबळेश्वर येथील विद्यार्थीनी स्वरा मंगेश सुर्वे हिची यावर्षी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतून नवोदय विद्यालय खावली ,सातारा येथे निवड झाली आहे.स्वराने 97.50 गुण मिळवत महाबळेश्वर तालुक्यातून जिल्हा गुणवता यादीमध्ये स्थान मिळवले आहे.स्वराने यापूर्वीही विविध स्पर्धा परीक्षेतून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
स्वराला शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे, उपशिक्षक महेश पवार व सचिन जगताप तसेच पालक मंगेश सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल महाबळेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी विजय विभुते,गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लता जाधव, उपाध्यक्ष संतोष मोरे, संपत जाधव, संतोष जाधव ,विशाल पवार ,ग्रामस्थ मंडळ चिखली,महाबळेश्वर तालुका शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.


Social Plugin