महाबळेश्वरमध्ये रंगणार दोन दिवसीय 'अभिनय* कार्यशाळा'; नवोदित कलाकारांसाठी सुवर्णसंधी*
महाबळेश्वर: प्रतिनिधी
गिरीस्थान महाबळेश्वर, पाचगणी आणि परिसरातील अभिनयाची आवड असलेल्या व या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाट्य शिव प्रतिष्ठान, महाबळेश्वर आणि अभिव्यक्त अभिनय अकॅडमी, सातारा-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विशेष अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा शनिवार दि. २८ मार्च २०२६ आणि रविवार दि. २९ मार्च २०२६ रोजी महाबळेश्वर येथील पुनम हॉटेल बँक्वेट हॉल येथे संपन्न होणार आहे.
या कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते श्री. अभिजित वाईकर लाभले आहेत. गेल्या २५ वर्षांपासून नाट्य व चित्रपट सृष्टीत सक्रिय असणारे श्री. वाईकर यांनी अनेक व्यावसायिक अभिनेता-अभिनेत्रींना घडवले असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा स्थानिक कलाकारांना मिळणार आहे.
कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होऊ शकते.
दर्जेदार प्रशिक्षणासाठी मोजक्याच कलाकारांना प्रवेश दिला जाणार आहे.
अत्यंत कमी शुल्कात जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची ही संधी आहे.
आपले नाव नोंदवण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे:
श्री. किसन खामकर: 8605420009
श्री. अभिजित वाईकर (मार्गदर्शक): 8623026125
श्री. देवकर मांडववाले: 9422404285
श्री. रणजीत तांबे: 9420633276
श्री. दीपक बावळेकर: 9420629454
महाबळेश्वर आणि परिसरातील जास्तीत जास्त कलाकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाट्य शिव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


Social Plugin