मेटगुताड मध्ये भक्तिमय वातावरणात रंगणार कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा...!
युवा पिढीचे कष्ट आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारले भव्य मंदिर ; दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन :
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (प्रतिनिधी)
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड गावामध्ये श्री हनुमान मंदिर उभारणीचा संकल्प पूर्णत्वास आला असून, येत्या १ व २ एप्रिल रोजी या नूतन मंदिराचा कलशारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. युवा पिढीची जिद्द, ग्रामस्थांची एकजूट आणि तालुक्यातील दानशूरांच्या मदतीमुळे हा सोहळा तालुक्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
युवाशक्ती आणि मार्गदर्शनाचा संगम
या संपूर्ण मंदिर उभारणीत मेटगुताडच्या युवा पिढीने अहोरात्र मेहनत घेतली आहे. मंदिर बांधकामापासून ते सोहळ्याच्या नियोजनापर्यंत तरुणांनी दाखवलेली चिकाटी वाखाणण्याजोगी आहे. याकामी त्यांना गावातील ज्येष्ठ नागरिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, तालुक्यातील देणगीदार आणि अन्नदात्यांच्या दातृत्वामुळे या सोहळ्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.
असा असेल कार्यक्रमाचा तपशील (रूपरेषा)
धार्मिक विधींची सुरुवात बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी होणार असून कार्यक्रमाचे नियोजन खालीलप्रमाणे आहे :
बुधवार, दि. ०१/०४/२०२६
दुपारी २:०० वा: कलशाला श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे अभिषेक.
दुपारी ४:०० वा: कलशाची गावातून भव्य 'ग्रामप्रभात फेरी'.
सायंकाळी ६:०० वा: कलश धान्याधिवास विधी.
रात्री ८:०० नंतर: सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम.
गुरुवार, दि. ०२/०४/२०२६
सकाळी ७:०० वा: संकल्प गणपती पूजन व पुण्याहवाचन.
सकाळी ८:०० वा: मूर्ती जलाधिवास व अभिषेक.
सकाळी ९:०० वा: होम-हवन विधी.
सकाळी ११:०० वा: मूर्ती स्थापना (वेदाचार्य श्री खरे काका यांच्या हस्ते) आणि कलशारोहण (श्री मंगलगिरी महाराज यांच्या शुभहस्ते). तसेच सत्यनारायण महापूजा.
दुपारी १२:०० वा: ह.भ.प. श्री प्रवीण महाराज शेलार (संस्थापक, श्री गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, आंबेघर) यांचे कीर्तन. याप्रसंगी महाबळेश्वर तालुका वारकरी संघटना व युवा वारकरी संघटना यांची साथ लाभणार आहे.
दुपारी २:३० वा: भव्य महाप्रसाद.
उपस्थितीचे आवाहन
ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारत असलेल्या या मंगलमयी सोहळ्यासाठी जय हनुमान मंडळ मेटगुताड व समस्त ग्रामस्थ मंडळ मेटगुताड यांनी तालुक्यातील सर्व भाविकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढवावी, अशी विनंती नम्रपूर्वक करण्यात आली आहे.
"श्रद्धा आणि कष्टाच्या जोरावर मेटगुताडच्या ग्रामस्थांनी उभे केलेले हे मंदिर तालुक्याच्या धार्मिक वैभवात भर घालणारे ठरेल."
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin