*महाबळेश्वर रोटरी व इनर व्हील क्लबच्यावतीने एचपीव्ही लसीकरण मोहीम* 💉
गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी मुलींना संरक्षण कवच
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर दि ३०-०३ रोटरी व इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी १४ ते १५ या वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी मोफत एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आला या कार्यक्रमांतर्गत शाळेमधील किशोरवयीन मुलींनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
महाबळेश्वर तालुक्यातील अधिकाधिक शाळांमधील व दुर्गम डोंगरी भागातील मुलींना या एचपीव्ही लसीकरणाचा लाभ देण्याचा संकल्प रोटरी अध्यक्ष रो विजय काळे व इनर व्हील अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी केला तसेच या मोहिमेचा मुख्य उद्देश गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) रोखणे असून या विषाणूविषयी जागरूकता निर्माण करणे असल्याचे यावेळी क्लबच्यावतीने सांगण्यात आले पुढील काळात तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन मुलींना आणि पालकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पंडित देशमुख यांनी पालक व विद्यार्थ्यांना एचपीव्ही लसीचे महत्त्व, गरज व फायदे याविषयी मार्गदर्शन केले ही मोहीम भारत सरकारच्या राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण कार्यक्रमाला पाठबळ देण्यासाठी राबवणेयात येत असून ज्याद्वारे मुलींच्या आरोग्यदायी भविष्यासाठी प्रयत्न केले जात आहेत यावेळी रोटरी अध्यक्ष रो विजय काळे इनर व्हील अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे,पीडीसी रोहिणी वैद्य,सविता पल्लोड,रो दिनेश भिसे,रो ब्रिजभूषण सिंग,रो शिरीष गांधी,रो स्वाती भांगडिया,रो मोनाली शिर्के-वाघ,नेहा साळवी,अश्विनी कोमटी आदीं रोटरी इनर व्हील सदस्यांसह ग्रामीण रुग्णालयाची टीम यावेळी उपस्थित होती


Social Plugin