Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

साज' हॉटेलकडून पर्यावरणाचा ऱ्हास; उघड्यावर सांडपाणी आणि कचरा टाकल्याने नागरिकांमधून संताप

 *द साज' हॉटेलकडून पर्यावरणाचा ऱ्हास; उघड्यावर सांडपाणी आणि कचरा टाकल्याने नागरिकांमधून संताप*

*प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांना केराची टोपली; कडक कारवाईची मागणी*

महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर(सातारा)



 द साज' या हॉटेलकडून सांडपाणी (मैला) थेट उघड्यावर सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरातील जलस्त्रोत आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने या हॉटेलवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी  उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका अध्यक्ष 

अभिषेक शिंदे यांनी वनविभाग महाबळेश्वर यांना दिलेल्या निवेदन मागणी केली आहे.


 हॉटेलमध्ये सुमारे ७९ रूम्स, मोठे रेस्टॉरंट आणि किचन कार्यरत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) निकषांनुसार, एवढ्या मोठ्या क्षमतेच्या हॉटेलसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) असणे आणि तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता येथील एसटीपी प्लांट बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रक्रिया न केलेले मैलापाणी उघड्यावर वाहत असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. जर प्लांट कार्यान्वित असेल, तर मग प्रक्रिया केलेले पाणी थेट पर्यावरणात का सोडले जात आहे आणि त्याला दुर्गंधी का येत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 केवळ सांडपाणीच नव्हे, तर हॉटेलमधून दररोज निघणारा सुका कचराही मोठ्या प्रमाणात परिसरात आढळून आला आहे. हॉटेलमध्ये कचरा प्रक्रियेसाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा दिसून येत नाही. हा सर्व कचरा छुप्या पद्धतीने जंगलात आणि मोकळ्या जागेत फेकून दिला जात असल्याचे चित्र आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे.

 जल (प्रदूषण आणि नियंत्रण) कायदा, १९७४ आणि पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसवणे अनिवार्य आहे. 'द साज' हॉटेल प्रशासनाकडून या दोन्ही कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नियमांना पायदळी तुडवून निसर्गाची हानी करणाऱ्या या हॉटेलवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

या संदर्भातील निवेदनाची तक्रारीची प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पाठवण्यात आली असून, आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क


             संपादक :- राहुल शेलार 


                  📱 9765576377


     कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 


                 📱 9403546 485