Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

धोकादायक आंबेनळी घाट: तुटलेल्या संरक्षण कठड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला.....

 धोकादायक आंबेनळी घाट: तुटलेल्या संरक्षण कठड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला..... 




 महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर (सातारा)

महाबळेश्वर आणि कोकणाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेला आंबेनळी घाट सध्या वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या घाटातील अनेक ठिकाणचे सिमेंटचे संरक्षण कठडे कोसळले असून, त्या ठिकाणी प्रशासनाकडून केवळ तात्पुरते पत्रे लावून वेळ मारून नेली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

​आंबेनळी घाट हा आपल्या तीव्र वळणांसाठी आणि खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. गेल्या काही काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि अपघातांमुळे घाटातील संरक्षक भिंती अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाल्या आहेत.

​ ज्या ठिकाणी कठडे तुटले आहेत, तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रे लावून बॅरिकेडिंग केले आहे.

रात्रीच्या वेळी किंवा धुक्याच्या दिवसात हे पत्रे वाहनचालकांना स्पष्ट दिसत नाहीत. जर एखाद्या वाहनाचे नियंत्रण सुटले, तर हे पातळ पत्रे वाहनाला दरीत कोसळण्यापासून रोखू शकणार नाहीत, हे स्पष्ट आहे.

​प्रवाशांच्या तक्रारी

​घाटातून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सांगितले की, "प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथे मजबूत सिमेंटचे कठडे बांधणे अपेक्षित होते. मात्र, केवळ पत्रे लावून सुरक्षेचा फार्स केला जात आहे. हे पत्रे केवळ दिशादर्शक ठरू शकतात, संरक्षक कवच नाही.

​कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने येथे पर्यटकांची आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. भविष्यात मोठा अपघात घडून जीवितहानी होण्यापूर्वी:

​तुटलेल्या ठिकाणी आरसीसी संरक्षण भिंती बांधाव्यात.

​संरक्षक कठड्यांना रेडियम रिफ्लेक्टर्स लावावेत.

​घाटातील धोकादायक वळणांवर ​केवळ पत्रे लावून प्रशासन जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवून तातडीने पक्के बांधकाम करणे गरजेचे आहे.


 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ  यावर कधी ठोस कारवाई करणार, याकडे स्थानिक नागरिक व प्रवाशांचे  लक्ष लागले आहे.

     


               बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                  संपादक :- राहुल शेलार 

                      📱 9765576377

            कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                      📱 9403546 485