Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

प्रतापगडाच्या संवर्धनाचा पुरता बोजवारा; कोट्यवधींचा निधी जातोय कुठे स्थानिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल: 'जबाबदार नक्की कोण

 प्रतापगडाच्या संवर्धनाचा पुरता बोजवारा; कोट्यवधींचा निधी जातोय कुठे स्थानिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल: 'जबाबदार नक्की कोण 



महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर(प्रतिनिधी)

ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले प्रतापगडाच्या जीर्णोद्धारासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, गडावर सुरू असलेल्या कामाचा अत्यंत निकृष्ट दर्जा पाहता, हा किल्ला पुढची १०० वर्षे टिकण्याऐवजी १०० दिवस तरी टिकेल का असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कामाच्या या संशयास्पद पद्धतीमुळे स्थानिक रहिवासी आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, 'या सगळ्याला नक्की जबाबदार कोण असा सवाल प्रशासनाला विचारला जात आहे.


तत्कालीन ​मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडाच्या संवर्धनासाठी मोठ्या मनान निधी मंजूर केला. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर कामाची परिस्थिती भीषण आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गडाच्या कामासाठी वापरला जाणारा माल हा अत्यंत खालच्या दर्जाचा असून, ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य आणि मजबुती धोक्यात आली आहे. सरकारने दिलेला निधी गडाच्या कामासाठी वापरण्याऐवजी कंत्राटदार आणि सप्लायर्सचे खिसे भरण्यासाठीच वापरला जात आहे का असा संतप्त प्रश्न आता विचारला जात आहे.

​प्रतापगडावर सुरू असलेल्या या अनागोंदी कारभारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

​प्रतापगड हा केवळ पर्यटनाचा भाग नसून तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या विश्वासाने निधी दिला, त्या विश्वासाला प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार तडा देत असल्याचा आरोप होत आहे. 


​जर वेळेत लक्ष दिले नाही, तर हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्यास प्रशासन जबाबदार राहील.


       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                 संपादक :- राहुल शेलार 

                    📱 9765576377

       कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                    📱 9403546 485