मंत्रालयात 'शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा'ची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई
महाबळेश्वर तालुका कामकाजाचा आढावा.....
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर प्रतिनिधी
सामान्यांच्या आरोग्यासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या महाबळेश्वर तालुका समन्वयक व पदाधिकाऱ्यांच्या शैक्षणिक तसेच कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आगामी काळातील आरोग्यविषयक उपक्रमांचे नियोजन आणि जनसेवेचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिलदादा मोरे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक संदीपकुमार जाधव व संतोष बामणे, सातारा जिल्हा प्रमुख हेमंत सुतार, सातारा संपर्क प्रमुख जयश्री ताई मोरे व हेमलता ताई शिंदे , उपजिल्हाप्रमुख सतीशजी ओंबळे, सुलोचना पवार (महिला आघाडी), प्रियांका नलावडे, आबासाहेब महामुनी. तालुका प्रमुख सचिन धायगुडे (खंडाळा), मोनिका पवार (कराड), सुवर्णा कत्रे (फलटण). महाबळेश्वर विभागातील तालुका समन्वयक राजेंद्र पंडित, मेघाताई चोरगे, वर्षाताई आरडे, शहर समन्वयक सुनिताताई फळणे, उपशहर समन्वयक शितलताई ओतारी, शाखा प्रमुख श्री. सचिन वाईकर व श्री. संजय कांबळे *मुंबई मंत्रालयात 'शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा'ची महत्त्वपूर्ण बैठक;*
*महाबळेश्वर तालुका कामकाजाचा आढावा*
महाबळेश्वर प्रतिनिधी: सामान्यांच्या आरोग्यासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या महाबळेश्वर तालुका समन्वयक व पदाधिकाऱ्यांच्या शैक्षणिक तसेच कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आगामी काळातील आरोग्यविषयक उपक्रमांचे नियोजन आणि जनसेवेचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिलदादा मोरे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक संदीपकुमार जाधव व संतोष बामणे, सातारा जिल्हा प्रमुख हेमंत सुतार, सातारा संपर्क प्रमुख जयश्री ताई मोरे व हेमलता ताई शिंदे , उपजिल्हाप्रमुख सतीशजी ओंबळे, सुलोचना पवार (महिला आघाडी), प्रियांका नलावडे, आबासाहेब महामुनी. तालुका प्रमुख सचिन धायगुडे (खंडाळा), मोनिका पवार (कराड), सुवर्णा कत्रे (फलटण). महाबळेश्वर विभागातील तालुका समन्वयक राजेंद्र पंडित, मेघाताई चोरगे, वर्षाताई आरडे, शहर समन्वयक सुनिताताई फळणे, उपशहर समन्वयक शितलताई ओतारी, शाखा प्रमुख सचिन वाईकर व संजय कांबळे तसेच प्रसिद्धी प्रमुख गौरव रमेश राक्षे, लक्ष्मण जाधव, उद्योजक प्रशांत हजारे, शहरप्रमुख विजय भाऊ नायडू, प्रभा नायडू, प्रवीण जिमन यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सर्व समन्वयकांनी आपल्या विभागातील आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर अहवाल सादर केला. ग्रामीण आणि शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवणे. शासकीय योजना आणि मदत कक्षाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा अधिक सुलभ करणे. भविष्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व्यापक नियोजन करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सामान्यांच्या कठीण काळात त्यांना आधार देणे हेच आमचे मुख्य ध्येय असून, आगामी काळात अधिक व्यापक आणि लोकाभिमुख कार्य करण्याचा आमचा निर्धार आहे," असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही बैठक संपन्न झाली. प्रसिद्धी प्रमुख श्री. गौरव रमेश राक्षे, श्री. लक्ष्मण जाधव, उद्योजक श्री. प्रशांत हजारे, श्री. विजय भाऊ नायडू, सौ. प्रभा नायडू, श्री. प्रवीण जिमन यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सर्व समन्वयकांनी आपल्या विभागातील आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर अहवाल सादर केला. ग्रामीण आणि शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवणे. शासकीय योजना आणि मदत कक्षाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा अधिक सुलभ करणे. भविष्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व्यापक नियोजन करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सामान्यांच्या कठीण काळात त्यांना आधार देणे हेच आमचे मुख्य ध्येय असून, आगामी काळात अधिक व्यापक आणि लोकाभिमुख कार्य करण्याचा आमचा निर्धार आहे," असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही बैठक संपन्न झाली.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin