Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये प्रामाणिकपणाचे दर्शन: बाबा भेळवाल्यांनी परत केला ५ लाखांचा ऐवज.....

 महाबळेश्वरमध्ये प्रामाणिकपणाचे दर्शन: बाबा भेळवाल्यांनी परत केला ५ लाखांचा ऐवज.....


महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर : प्रतिनिधी 



पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरातील बॉम्बे भेळ व पावभाजी सेंटरचे  मालक  खालीद नालबंद  उर्फ बाबा भाई या व्यावसायिकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.   श्री. बाबा भाई यांना वेण्णा लेक परिसरात तब्बल ५ लाख रुपयांचा ऐवज सापडला, जो त्यांनी तत्काळ पोलीस आणि मूळ मालकाच्या स्वाधीन करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, वेण्णा लेक येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. याच ठिकाणी आपला व्यवसाय सांभाळत असताना बाबा भाई यांना एक बॅग मिळून आली. त्यांनी ती उघडून पाहिली असता, त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख रुपयांचा मौल्यवान ऐवज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ​इतकी मोठी रक्कम आणि दागिने समोर असूनही बाबा भाई यांचा पाय डगमगला नाही. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.  पोलिसांनी सर्व खातरजमा केल्यानंतर, बाबा भाई व पोलीस निरक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या हस्ते तो ऐवज मूळ मालकाला सुपूर्द करण्यात आला.

​आपला लाखो रुपयांचा ऐवज सुखरूप मिळाल्यामुळे पर्यटकाने बाबा भाईंचे डोळे भरून आभार मानले. महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि पोलिसांनीही बाबा भाईंच्या या कृत्याचे विशेष कौतुक केले आहे.


​आजच्या काळात जिथे माणुसकी हरवत चालली आहे, तिथे बाबा भाईंनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे," अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.


​सध्या संपूर्ण महाबळेश्वरमध्ये बाबा भाईंच्या या प्रामाणिकपणाची चर्चा मोठ्या अभिमानाने होत आहे.



बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

        संपादक :- राहुल शेलार 

             📱 9765576377

  कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                📱 9403546 485