महाबळेश्वरमध्ये 'नाट्य शिव प्रतिष्ठान'तर्फे दोन दिवसीय अभिनय कार्यशाळा संपन्न....
शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (प्रतिनिधी)
शहरी व ग्रामीण भागातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या येथील 'नाट्य शिव प्रतिष्ठान'च्या वतीने जागतिक रंगभूमी दिनानिमित्त दोन दिवसीय विनामूल्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पूनम हॉटेलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यशाळेला महाबळेश्वर मधील शाळा क्र.१, शाळा क्र.२, एम इ एस इंग्लिश मिडीयम हायस्कूल, गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,सेठ गंगाधर मखरिया हायस्कूल, अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल, चेतन दत्तजी गायकवाड हायस्कूल मेटगुताड या शालेय विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेचे उद्घाटन नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते आणि माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेविका विमलताई पार्टे, स्मिता पाटील, संगीता वाडकर, पल्लवी कोंढाळकर, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, संतोष(आबा) शिंदे, संजय जंगम, माजी नगरसेवक युसुफ शेख उपस्थित होते.
प्रारंभी नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बोलताना नगराध्यक्ष शिंदे यांनी नाट्य शिव प्रतिष्ठानच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव केला व अशा उपक्रमांमुळे स्थानिक बालकलाकारांमधील सुप्त गुणांना वाव मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव खामकर यांनी प्रास्ताविकात या विनामूल्य कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी प्रभाकर देवकर (उपाध्यक्ष),अरुण शिंगरे (सचिव), राजेश कुंभारदरे(कार्याध्यक्ष), संदीप देवकुळे (खजिनदार),लीलाताई शिंदे, राणीताई शिंगरे, रणजित तांबे, विजयराव भिलारे,रवींद्र संकपाळ, दीपक बावळेकर, चिन्मय आगरकर, श्रीकांत जाधव,गोविंद कदम, राजू गुजर, संतोष पवार, नितीन चौरसिया, दिलीपशेठ शिपटे, दिनेश भिसे आधी उपस्थित होते.
सातारा येथील प्रसिद्ध 'अभिव्यक्त अभिनय नृत्य अकादमी'चे प्रमुख अभिजित वाईकर व शिल्पा वाईकर यांनी या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना अभिनयाचे प्राथमिक धडे, संवादफेक, देहबोली आणि रंगमंचावरील वावर यांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील मुलांमध्ये उपजत कला असते, तिला केवळ योग्य प्रशिक्षणाची जोड हवी. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या मुलांसाठी ही संधी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत असल्याचे नाट्य शिव प्रतिष्ठान अध्यक्ष किसनराव खामकर यांनी व्यक्त केला.
या यशस्वी उपक्रमाबद्दल महाबळेश्वरमधील कलाप्रेमी आणि पालकांनी नाट्य शिव प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले आहेत.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin