महाबळेश्वरमध्ये 'रोटरी आशा एक्सप्रेस'द्वारे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर, इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर आणि कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वरमधील महिलांसाठी एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी आशा एक्सप्रेस मोबाईल स्क्रीनिंग व्हॅनच्या माध्यमातून हे मोफत तपासणी शिबिर संपन्न होणार असून, महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.लवकर निदान, हेच सर्वोत्तम संरक्षण हे ब्रीदवाक्य घेऊन हे शिबिर राबवले जात आहे.
दिनांक: बुधवार, १५ एप्रिल २०२६
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ४ वाजेपर्यंत
स्थळ: पेटिट लायब्ररी, महाबळेश्वर या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मोबाईल स्क्रीनिंग व्हॅनमध्ये अत्याधुनिक उपकरणांद्वारे खालील तपासण्या केल्या जातील
रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातील शर्करा प्रमाण,छातीत दुखणे व संबंधित तपासणी,मासिक पाळी संबंधित समस्यांवर सल्ला
व गर्भाशय संबंधित आजारांची तपासणी किती जाणार आहे.
या शिबिरासाठी आगाऊ नाव नोंदणी कार्यक्रम स्थळीच केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी
स्वाती भांगडीया : ९४२११७८४३५
सपना अरोरा : ९४०५६०७६२
शिरीष गांधी : ९४२३२६२७१०
मुक्ता कोमटी : ९४२३४३६३१ यांच्याशी संपर्क साधावा.
महिलांच्या आरोग्यासाठी राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी अध्यक्ष विजय काळे आणि इनरव्हील अध्यक्ष वर्षा पारठे यांनी केली आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin