Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र महाबळेश्वर च्या प्रसिद्ध कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला

 महाबळेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र महाबळेश्वर च्या प्रसिद्ध कृष्णाबाई मंदिराच्या छताचा भाग कोसळला

गोमुखाखाली असलेल्या कुंडाची स्वच्छता करत असताना घटना ; युवक बचावले



 महाबळेश्वर टाईम्स 

 महाबळेश्वर : प्रतिनिधी 

महाबळेश्वर तालुक्यातील पवित्र तीर्थस्थळ व पाच नद्यांचे उगमस्थान श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील प्राचीन श्री कृष्णाबाई मंदिरा समोरील गोमुखाखाली असलेल्या कुंडाची काही दिवसांपूर्वी स्थानिक युवक स्वच्छता करत असतानाच मंदिराचा छताचा काही भाग थेट कुंडामध्ये कोसळला सुदैवाने युवक थोडक्यात बचावले

                         श्री कृष्णाबाई या पुरातन मंदिराची गेली अनेक वर्षे देखभाल दुरुस्थी अभावी या मंदिराची प्रचंड दुर्दशा झाली आहे पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून पंचनामा होण्यासह हा भाग कश्यामुळे कोसळायला याची शहानिशा होणे आवश्यक आहे अनेक शतके ऊन जोरदार वारा पाऊस झेलून देखील उभे असलेलया या मंदिराची दुरुस्थी करावी अशी मागणी जोर धरत आहे

                जुने क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ आणि पंचनद्यांचा उगम म्हणून सर्वपरिचित आहे महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो या ठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे या मुख्य मंदिरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर श्री कृष्णाबाई मंदिर आहे कृष्णा नदीचा उगम इथूनच झाला म्हणून याचे नाव कृष्णामाई मंदिर! तसे हे मंदिर कृष्णाबाई अथवा कृष्णाई मंदिर या नावाने देखील ओळखले जाते या मंदिराचे बांधकाम काळे दगड रचून केले गेले होते हे हेमाडपंती बांधकामाच्या अनेक दशके आधीचे बांधकाम असल्याची माहिती मिळत आहे श्री कृष्णाबाई हे मंदिर काहीसे दुर्लक्षित होते अलीकडे काही वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने उत्खनन करून, साफसफाई करून हे मंदिर उजेडात आणले हे मंदिर पुरातत्व विभागाकडे आहे मंदिराच्या स्वच्छतेसाठी विभागाच्यावतीने एक कर्मचारी देखील आहे काही दिवसांपूर्वी येथील दादासो लोंढे यांच्यासह स्थानिक युवक अमित झाडे,सौरभ गोळे व सौरव साळेकर हे मंदिरासमोरील गोमुख खालील कुंडामध्ये साचलेला गाळ काढण्यास व स्वच्छता करत होते कुंडामधील पाणी बाहेर काढून मंदिराची स्वच्छता सुरु होती गोमुखातील साचलेला चिखल काढण्यासाठी एक युवक काम करत होता त्याच वेळी मंदिराच्या छताचा एक भाग अचानक कोसळून थेट कुंडामध्ये कोसळला सुदैवाने युवक थोडक्यात बचावले मात्र पुरातत्व विभागाने या घटनेचा पंचनामा करून ही घटना कशी घडली याचा अभ्यास करण्यासह मंदिराची देखभाल दुरुस्थीसाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे या घातला काही दिवस उलटून देखील पुरातत्व विभागाने हे गांभीर्यानं घेतले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.


                 बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                         संपादक :- राहुल शेलार 

                            📱 9765576377

             कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                            📱 9403546 485